cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रकमेत पाचपट वाढ
Business

आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रकमेत पाचपट वाढ

CliQ INDIA
Last updated: August 10, 2025 6:37 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 9 ऑगस्ट (हिं.स.)। खासगी क्षेत्रातील आघाडीची आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांसाठी किमान मासिक सरासरी शिल्लक रकमेची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवली असून, नवे नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले आहेत. नवीन नियमानुसार, महानगर आणि शहरी भागातील खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम 10,000 वरून थेट 50,000 करण्यात आली आहे. लहान शहरांमध्ये ही मर्यादा 5,000 वरून 25,000 केली असून ग्रामीण शाखांसाठी 2,500 वरून 10,000 इतकी वाढ झाली आहे.

किमान शिल्लक राखण्यात अपयशी ठरलेल्या ग्राहकांना, कमतरतेच्या रकमेच्या ६ टक्के किंवा 500 — यापैकी जे कमी असेल ते दंड म्हणून आकारले जाणार आहे. फॅमिली बँकिंग सुविधेत सहभागी असले तरी, वैयक्तिक खात्यात आवश्यक शिल्लक न ठेवल्यास शुल्क लागू होईल. मात्र पेन्शनधारकांना या शुल्कातून सूट मिळणार आहे.

बँकेच्या या निर्णयाचा विशेषतः ग्रामीण व अर्धशहरी भागातील आणि कमी उत्पन्न असलेल्या खातेधारकांवर आर्थिक ताण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अनेक ग्राहक कमी किमान शिल्लक असलेल्या बँकांचा पर्याय निवडतील किंवा ‘मूलभूत बचत खाते’ प्रकाराकडे वळतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

इतर प्रमुख बँकांचे नियम:

एसबीआय: २०२० पासून सर्व बचत खात्यांसाठी किमान शिल्लक नाही, दंड नाही.

पीएनबी: जुलै २०२५ पासून किमान शिल्लक दंड रद्द.

एचडीएफसी बँक: महानगर १०,०००; लहान शहरे ५,०००; ग्रामीण २,५००. दंड ६०० पर्यंत.

अ‍ॅक्सिस बँक: महानगर १२,०००; लहान शहरे ५,०००; ग्रामीण २,५००. शून्य-बॅलन्स खाती उपलब्ध.

बँक ऑफ बडोदा: जुलै २०२५ पासून सामान्य खात्यांवर दंड नाही; प्रीमियम खात्यांसाठी ५००- २,००० मर्यादा.

ग्राहक संघटनांकडून या वाढीबाबत टीका होत असून, अनेकांनी याला सामान्य खातेदारांवरचा आर्थिक भार वाढवणारा निर्णय म्हटले आहे. मात्र बँकेचे म्हणणे आहे की हा बदल बँकिंग सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि कार्यकारी खर्च भागवण्यासाठी करण्यात आला आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

अर्थसंकल्पीय अधिवेशन, तिसरा दिवस: लोकसभा सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा, विरोधकांचा गदारोळ.
‘गोदरेज’च्या ‘वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम’मुळे दररोज १७०० केडब्ल्यूएच इतकी उर्जेची बचत
जिओने भारताचा पहिला एआय-रेडी क्लाउड-आधारित जिओपीसी केला लाँच
गोदरेज प्रॉपर्टिंजने नागपूरमध्ये अधिग्रहित केली जवळपास १०९ एकर जमीन
सोनं-चांदी स्वस्त होताच सराफा बाजारात गर्दी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नवनीत राणांना धमकावल्या प्रकरणी 5 आरोपींना अटक
Next Article हर घर तिरंगा मोहीम लातूर शहरात तीन टप्प्यात विविध उपक्रमांचे आयोजन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?