cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > इंदिरा आयव्हीएफची सेफ ट्री सह भागीदारी
Business

इंदिरा आयव्हीएफची सेफ ट्री सह भागीदारी

CliQ INDIA
Last updated: December 24, 2023 11:00 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

मुंबई, 24 डिसेंबर, (हिं.स.) भारतातील वंध्यत्व उपचार रुग्णालयांचे सर्वात मोठे नेटवर्क असलेले इंदिरा आयव्हीएफ आणि एक अग्रगण्य इनश्युटेक सेफ ट्री यांनी वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आधार देण्यासाठी भारतातील पहिली विमा योजना सादर करण्यासाठी सहयोग करत असल्याची घोषणा केली आहे. देशातील अशा प्रकारच्या या वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य विम्याचे उद्दिष्ट जोडप्यांना त्यांच्या उपचार खर्चात लक्षणीय बचत करण्यास मदत करून देशातील आरोग्यसेवा सादर करण्यात सुधारणा करणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने वंध्यत्वाची व्याख्या पुरुष किंवा स्त्री यांच्या प्रजनन प्रणालीमधील एक विकार म्हणून केली आहे. यामध्ये १२ महिने किंवा त्याहून अधिक काळ नियमितपणे असुरक्षित लैंगिक संबंधांनंतरही गर्भधारणा होऊ शकत नाही. भारतात, प्रजनन क्षमता असलेल्या वयातील अंदाजे ३३-३४ दशलक्ष जोडप्यांना कायमस्वरूपी वंध्यत्व विषयक आजारांचा त्रास सहन करावा लागतो. परंतु, यापैकी केवळ १% लोक त्यांच्या उपचारांसाठी विश्वासार्ह रुग्णालयात जातात. याचे कारण जागरूकतेचा अभाव आणि कुटुंबांना तोंड द्यावे लागणारे आर्थिक प्रश्न यात आहे.

या अत्यंत पथदर्शी उपक्रमाची घोषणा करताना इंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक डॉ. क्षितिज मुर्डिया म्हणाले, “वंध्यत्व उपचारातील एक अग्रणी म्हणून आम्ही भारतीय समाजामध्ये वंध्यत्व आणि त्यानंतर उपचार सुरू असताना व्यक्तींना त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासाकडे जाताना आधार देण्याबाबत जागरूकता यातील अंतर भरून काढण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या स्थापनेपासून आणि आमच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून, आम्ही विविध सामाजिक-आर्थिक वर्गातील समाजामध्ये वंध्यत्वाशी संबंधित चुकीच्या माहितीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत. त्यामुळे आर्थिक सहाय्य पुरवून वंध्यत्व उपचारासाठीचा मर्यादित अॅक्सेस भरून काढणे हे आमच्यासाठी एक धोरणात्मक पाऊल होते. वंध्यत्व उपचाराबाबत देशात समानता आणण्याबाबत आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असणाऱ्या सेफ ट्री सोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि असंख्य जोडप्यांच्या जीवनात विलक्षण प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

वंध्यत्व उपचारांसाठी विमा असण्याच्या गरजेवर प्रकाश टाकताना सेफ ट्री इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास आनंद म्हणाले, “वंध्यत्व हा कोणत्याही जोडप्यासाठी भावनिकरित्या नाजूक, हळवा अनुभव असतो. आम्ही केलेल्या एका ग्राहक संशोधनादरम्यान आम्हाला आढळले की उपचार घेत असलेल्या ३ पैकी २ जोडप्यांना ही उपचारप्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक वाटली आणि ९०% पेक्षा जास्त जोडप्यांना यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाची कमतरता होती. यासाठी विमा संरक्षण हवे अशी वाढती मागणी आम्हाला विशेषत: टियर-२ भागातून दिसून आली. त्या भागात आरोग्यसेवेसाठी खर्च करण्याची क्षमता अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अद्वितीय आणि जोडप्यांना देऊ केला जाणारे अशा प्रकारचे पहिलेच पाठबळ आहे.”

इंदिरा आयव्हीएफ आणि सेफ ट्री द्वारे सादर केल्या जाणाऱ्या विमा योजनेत प्रथम २४ महिन्यांसाठी एक सक्रिय दृष्टीकोन अंगिकारण्यात येईल. त्यात ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा व्हायला मदत करण्यासाठी वैद्यकीय, आहारविषयक आणि मानसिक सल्लासेवा दिली जाईल. हे सल्लागार जोडप्यांना विविध वैद्यकीय आणि जीवनशैलीच्या सवयींबद्दल त्यांचे ज्ञान आणि जागरुकता वाढवून मदत करतील आणि नंतर नैसर्गिक मार्गाने पालक होण्यासाठी त्यांची प्रजनन क्षमता वाढवतील. त्यानंतर जी जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांच्या साठी विमा कार्यक्रम अनुक्रमे दोन आययूआय (इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन) आणि दोन आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) चे कॅशलेस उपचार प्रदान करेल. त्यामध्ये एग कलेक्शन, लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोसिस्ट कल्चर, एम्ब्रीयो ट्रान्सफर आणि फ्रीजिंग यांचा समावेश आहे.

सेफ ट्री अनुक्रमे सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) कायदा, 2021 आणि सरोगसी (नियमन) कायदा, 2021 नुसार ओसाईट किंवा एग डोनर आणि सरोगेट्ससाठी विमा विस्तारित करते. शिवाय, दोन्ही संस्था वंध्यत्व उपचारांशी संबंधित एक समग्र परिसंस्था निर्माण करण्यासाठी आहारतज्ञ, समुपदेशक आणि स्त्रीरोग तज्ञांच्या पॅनेलद्वारे समर्थित विविध प्रजनन क्षमता मूल्यांकन साधने आणि विमा उत्पादने विकसित करत आहेत.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

‘गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप’ ची ‘राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन’ परिषद संपन्न
इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा
देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात व्यापारी वर्गाचे मोठे योगदान – पियूष गोयल
गोदरेज ग्रुपने सुरु केले सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट अवॉर्ड
टाटा एआयएने पॉलिसीधारकांसाठी 1,465 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक बोनस केला घोषित | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूर : गुंड अभिजित बंडगरची तुरुंगात रवानगी
Next Article शहर इंडिया आघाडीच्या वतीने पूनम गेटवर आंदोलन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?