सोलापूर 24 डिसेंबर ( हिं.स)इं डिया आघाडीच्या १४६ खासदारांना निलंबित केल्याच्या प्रकरणी शहर इंडिया आघाडीच्या वतीने पूनम गेटवर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष भारत जाधव,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अजय दासरी, अमर पाटील, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष निहाल किरनळ्ळी, माकपचे एम.एच. शेख, समाजवादी पक्षाचे अबुतालिब डोंगरे, माजी आमदार प्रकाश यलगुलवारमाजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना उपनेते शरद कोळी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सक्षणाताई सलगर, माजी महापौर मनोहर सपाटे, प्रमोद गायकवाड़, सुधीर खरटमल, प्रताप चव्हाण, संजय हेमगड्डी, विष्णु कारमपुरी, श्रीकांत वाघमारे, दिनेश संगेपाग, काँग्रेसचे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे आदी उपस्थित होते.
आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी संसदेत काही लोक घुसले होते. ते लोक सुरक्षा व्यवस्था भेदून कसे घुसले हे विचारणाऱ्या इंडिया आघाडीच्या १४६ खासदारांना निलंबित केल्याचा निषेध करतो.ज्यांच्या पासवर हे लोक संसदेत घुसले त्यांचे निलंबन होत नाही. अत्याचारी बृजभूषणचे निलंबन होत नाही. पण प्रश्न विचारणाऱ्या खासदारांचे निलंबन करण्यात आले. लोक महागाईने, बेरोजगारी मरत आहेत, गॅस दर वाढले, कामगारांना काम नाही. तुमच्यासोबत देशाचा पंतप्रधान नाही पण आम्ही सोबत आहोत हे दाखवून दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
