पुणे, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सराईतांवर धडक कारवाई सुरू केली आहे. परिमंडळ एकमधील ४३ सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली.परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
परिमंडळ एकच्या हद्दीत शिवाजीनगर, खडक, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ आणि डेक्कन या सहा पोलिस ठाण्यांचा समावेश होतो.या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ४३ सराईत गुन्हेगारांविरुद्ध बेकायदा शस्त्रसाठा, दारू विक्री, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांचा काही सराईत गुंड टोळ्यांशी संबंध असल्याची माहिती रावले यांनी दिली.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
