नाशिक (प्रतिनिधी) : प्रेमसंबंध प्रस्थापित करुन अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणाने विवाहितेवर तीन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विवाहिता व आरोपी स्वप्नील शार्दुल (वय३१, रा. समतानगर, टाकळीरोड, नाशिक) हे एकमेकांचे परिचित आहेत. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी शार्दुल याने पिडीतेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यान, आरोपीने पिडीतेसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन व ही गोष्ट पतीला सांगण्याचा दम देऊन पिडीतेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्या संमतीशिवाय शारिरीक संबंध प्रस्तापित केले. हा प्रकार १ जानेवारी २०२१ ते २१ डिसेंबर २०२३ दरम्यान कदम मळा, जत्रा हॉटेलसमोर व आडगाव येथे हा प्रकार घडला. दरम्यान, वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पिडीतेने आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्निल शार्दुलविरुद्ध गुन्हा केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
