नाशिक, २८ ऑक्टोबर (हिं.स.) :महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज शनिवारी (२८ऑक्टोबर) रोजी महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन यांचेसह जनमित्र व कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
