नायलॉन मांजामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये नागरिक जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही गंभीर प्रकरणांमध्ये जीवितहानी झाली आहे. याला आळा घालण्यासाठी, नायलॉन मांजाच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर कठोर प्रतिबंध आणण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. या संदर्भात, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विविध संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
BulletsIn
- नायलॉन मांजाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी: नायलॉन मांजाच्या उत्पादन व विक्रीवर कठोर बंदी आणावी व ऑनलाईन विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
- जनजागृती अभियान: नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी महानगरांमध्ये लाऊडस्पीकर, पोस्टर्स व जनजागृती उपक्रम राबविण्याच्या सूचना.
- नागरिकांचा उत्साह कमी न होण्याची काळजी: जनजागृती करताना नागरिकांचा सणांचा उत्साह कायम राहील याची काळजी घेण्याचे निर्देश.
- चांगल्या संकल्पनांचा अवलंब: छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी राबवलेल्या चांगल्या संकल्पनांचा इतर महापालिका व पोलीस आयुक्तांनी अवलंब करावा.
- यु कमान तपासणी: दुचाकी वाहनांवर यु कमान बसवण्याबाबत तपासणी करण्यात यावी.
- टोल-फ्री क्रमांक सुरू करणे: मांजा विक्री, उत्पादन आणि घटनांची माहिती मिळवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक जारी करावा.
- वाहतूक पोलीसांची सतर्कता: नायलॉन मांजावरील कारवाईसाठी वाहतूक पोलीसांना अलर्ट ठेवण्याचे निर्देश.
- आपत्कालीन पथके नेमणे: रस्त्यांवर आपत्कालीन पथके नेमून जखमी व्यक्तींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभारावी.
- वैद्यकीय मदतीची व्यवस्था: मांजामुळे जखमी होणाऱ्या व्यक्तींना तातडीने मदत मिळावी यासाठी यंत्रणा निर्माण करावी.
- प्रत्येक भागातील कारवाईचा आढावा: बैठकीत विविध अधिकाऱ्यांनी नायलॉन मांजावर केलेल्या कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती सादर केली.
