पुणे 13 नोव्हेंबर (हिं.स) : ”नवी दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या समस्येमुळे चार दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या तशीच परिस्थिती आता मुंबई पुण्यासह मोठ्या शहरामध्ये निर्माण होत आहे. लहानमुले व ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यातून अनेक आजार उदभवू शकतात.दिवसेंदिवस प्रदूषणाची वाढत चालेली पातळी रोखण्यासाठी व प्रदूषण मुक्त परिसर होण्यासाठी मोठ्याप्रमाणात जणजागृतीची गरज आहे.” असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
मंचर (ता.आंबेगाव) येथे उपजिल्हा रुग्णालयात रजनी प्रकाश फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दिव्यांग, आशा सेविका, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आदी ५१० जणांना दिवाळी फराळ वाटप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पांडुरंग महाराज येवले, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, रजनीबेन शहा, नेत्रा शहा, स्विटी शहा, प्रशांत बागल, प्रकाश घोलप, अजय घुले, डॉ.तुषार पवार, संजय बाणखेले, संतोष भोर उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
