लासलगाव, १४ ऑक्टोबर : येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील एनसीसी विभागातील कॅडेट प्रणव संतोष बच्छाव या विद्यार्थ्याची आय जी सी इंटर ग्रुप कॉम्पिटिशन पुणे येथे निवड झाली आहे.सदर विद्यार्थ्यांची नाशिक जिल्ह्यातून सांस्कृतिक विभागातून प्रथम निवड झाली होती त्यानंतर मुंबई विभाग व नाशिक विभागातून प्रणवची पुणे येथे होणाऱ्या इंटर ग्रुप कॉम्पिटिशन साठी निवड झालेली आहे.सदर शिबिर मंगळवार दिनांक 17 / 10 /2023 पासून पुणे येथे सुरू होत आहे.या शिबिरात पुणे,औरंगाबाद, अमरावती,नागपूर,मुंबई या विभागातील विद्यार्थी सहभागी होणार आहे.या शिबिरात प्रणव याने उल्लेखनीय कामगिरी केल्यास 26 जानेवारी 2023 च्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या संचालनासाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे.
प्रणव हा अत्यंत गुणी मुलगा असून उत्कृष्ट गायन व उत्कृष्ट वादन करतो. या विद्यार्थ्याला विद्यालयाचे एनसीसी अधिकारी प्रमोद पवार तसेच संगीत शिक्षक दत्तात्रय मरकड,क्रीडा शिक्षक चंद्रकांत नेटारे,संदीप गंभीरे विद्यालयाचे प्राचार्य दत्तू गांगुर्डे,पर्यवेक्षक उत्तम कुशारे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्यासह संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
