cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > बाबा सैलानीच्या 12 भाविकांवर काळाची झडप
National

बाबा सैलानीच्या 12 भाविकांवर काळाची झडप

CliQ INDIA
Last updated: October 16, 2023 12:22 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

सर्व अपघातग्रस्त नाशिक जिल्ह्यातील रहिवासी

छ. संभाजीनगर 15 ऑक्टोबर : छत्रपती संभाजी नगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात जीव गमावणारे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होता. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील बाबा सैलानी यांच्या मजारचे दर्शन घेऊन घर परत निघाले होते. यामध्ये 12 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील भाविक मिनी ट्रॅव्हल्सने बुलढाणा जिल्ह्यातील बाबा सैलानीच्या मजारचे दर्शन करण्यासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामधल्या जांबरगाव टोल प्लाजा येथे या भाविकांचा वाहनाने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमाराला घडलेला हा अपघात इतका भीषण होता की, यात 12 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उर्वरित इतर प्रवासी जखमी झालेत. या अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले.

अपघाताच्या वैळी ट्रॅव्हल्समध्ये 30 प्रवासी होते. त्यापैकी तनुश्री लखन सोळसे ( वय 5 वर्षे, रा. समतानगर,नाशिक) संगीता विलास आठवले (वय 40 वर्षे,वणसगाव, निफाड,नाशिक) अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे, रा. राजूनगर नाशिक) रतन जमधडे (वय 45 वर्षे, संत कबीर नगर नाशिक) काजल लखन सोळसे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक) रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक) हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 वर्ष, उजगाव निफाड, नाशिक) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे, रा. राजूनगर नाशिक) अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे) सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे) मिलिंद पगारे (वय 50 वर्षे, कोकणगाव ओझर, निफाड, नाशिक) दीपक प्रभाकर केकाणे (वय 47 वर्षे, रा. बसमत पिपळगाव नाशिक) अशा 12 प्रवाशांचे या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय.

You Might Also Like

रामदास आठवले यांनी घेतली जागतिक धम्मगुरु दलाई लामा यांची भेट
पहिल्या ऑनलाइन गेमिंग अधिवेशनाचे आयोजन ५ डिसेंबर रोजी
पंतप्रधान शनिवारपासून 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर
जर भारत तंदुरुस्त असेल, तरच प्रगती साध्य होईल – उपराष्ट्रपती
अन्न प्रक्रिया क्षेत्र बनले नवा उद्योग- पंतप्रधान

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्री तांबडी जोगेश्वरी मातेच्या मंदिरात दर्शन
Next Article समृद्धी महामार्ग : 4 महिने 3 अपघात 54 ठार !
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?