सातारा, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : सातारा येथील श्यामसुंदरी चारिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के .एस.डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे संपन्न झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे.
फलटण विरुद्ध रंगलेल्या अंतिम सामन्यात हा विजय नोंदवला. फलटण संघावर मात करत आता शानभाग विद्यालयाचा संघ झोनल स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या सर्व क्रिकेट खेळाडूंना शानभाग विद्यालयाचे प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रफुल्ल देखणे तसेच अभिजीत मगर यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयाबद्दल अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत मिळवलेल्या प्राविण्याबद्दल के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त उषा शानभाग, संचालिका आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार
