अहमदनगर, 27 ऑक्टोबर(हिं.स.):- सोनी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या गाथा नवनाथांची मालिकेत बाल नागनाथांची एण्ट्री झाली आहे.त्यांची भूमिका कोण साकारत आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी भाग पाडणारी गाथा नवनाथांची ही मालिका लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांचीच लाडकी आहे.मालिकेत बाल नागनाथांचा महिमा लवकरच पाहायला मिळणार आहे.विशेष म्हणजे प्रेक्षकांचा लाडका बालकलाकार आरूष बेडेकर बाल नागनाथांची भूमिका साकारणार आहे.आरूषने याआधीही आपल्या निरागस अभिनयानी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच.आता बाल नागनाथांच्या भूमिकेत तो कशा पद्धतीनं आपल्याला भुरळ घालतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी भाग पाडणारी ही मालिका लहानांपासून-मोठ्यांपर्यंत साऱ्यांचीच लाडकी असून अशा मालिका आत्ताच्या घडीला प्रसारित करणं ही आपली जबाबदारी समजून सोनी मराठी या मालिकांच्या भागांची अभ्यासपूर्ण मांडणी करत असते.आता बाल नागनाथांचा महिमा गाथा नवनाथांची या मालिकेमध्ये पाहायला मिळतो आहे.सोनी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर संध्याकाळी साडेसहा वाजता या मालिकेचे प्रसारण सुरू आहे. योगी योगेश्वर जय शंकर या मालिकेतील बाल शंकर महाराजांच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला आरुष बेडेकर आता नवनाथांमधील नागनाथ या नवीन भूमिकेद्वारे पुन्हा प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये या सिरीयलचे शूटिंग सध्या सुरु आहे.या मालिकेमध्ये नकुल घाणेकर,जयेश शेवलकर,सुरभी हांडे यासारखे अनेक प्रसिद्ध कलाकार काम करत आहे.
हिंदुस्थान समाचार
