रत्नागिरी, 18 नोव्हेंबर, (हिं. स.) : राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रमोद महाजन क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.
स्पर्धा १४ वर्षांखालील मुले- मुलींसाठी २७ नोव्हेंबर रोजी, १७ वर्षांखाली मुले व मुलींसाठी २८ नोव्हेंबर रोजी तर १९ वर्षांखालील मुले व मुलींसाठी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.
अधिक माहितीकरिता टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव सिद्धेश गुरव ८७७९६६९४९६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई द्वारा नव्याने मान्यता दिलेल्या खेळांच्या क्रीडा स्पर्धा आयोजनास शासकीय योजनांचे लाभ ५ टक्के खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोख पारीतोषिके अनुज्ञेय असणार नाहीत, याची नोंद सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, पालक यांनी घ्यावी. स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता विहित नमुन्यातील स्पर्धा प्रवेशिका, खेळाडू ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह स्पर्धा ठिकाणी उपस्थित राहावे, असे सूचित करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
