cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > भारताच्या यशस्वी जयस्वालने ठोकले पहिले-वहिले दणदणीत द्विशतक
Sports

भारताच्या यशस्वी जयस्वालने ठोकले पहिले-वहिले दणदणीत द्विशतक

CliQ INDIA
Last updated: February 4, 2024 12:12 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

– अनेक रेकाॅर्ड करत दिग्गजांच्या यादीत समावेश

मुंबई, 3 फेब्रुवारी : – भारतीय संघाचा उदयोन्मुख सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दणदणीत द्विशतक ठोकले आहे. त्याने विशाखापट्टणम येथे दुसऱ्या दिवशी यशस्वीने २९० चेंडूत २०९ धावांची शानदार खेळी करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली वहिली द्विशतकी कामगिरी केली आहे. यात १९ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. या द्विशतकासह त्याने अनेक रेकॉर्ड केले असून तो भारतात द्विशतक करणारा सर्वांत युवा सलामीवीर ठरला आहे.

द्विशतक करणारा चौथा डावखुरा फलंदाज ठरला आहे. यशस्वीच्या आधी सौरव गांगुली, विनोद कांबळी आणि गौतम गंभीर या तिघांनी ही कामगिरी केली आहे. २००७ मध्ये गांगुलीने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकले होते. त्यानंतर पहिल्यांदाच एका डावखुऱ्या भारतीय सलामीवीराने कसोटी द्विशतक ठोकले.

कमी डावात आणि कमी वयात द्विशतक

द्विशतकवीरांच्या यादीत कमी वयात द्विशतक करणाऱ्या सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत विनोद कांबळी हा पहिल्या क्रमांकावर असून त्याने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध वयाच्या २१ वर्षे ३५ व्या दिवशी द्विशतक केले होते. तर सुनील गावस्करने २१ वर्षे २८३ दिवसांचा असताना द्विशतक ठोकले होते. यशस्वी जैस्वालने आज वयाच्या २२ वर्षे ३७ दिवसांचा असताना द्विशतक ठोकत मोठा पराक्रम केला.

भारतीय संघासाठी कमी डावात द्विशतक करण्याबाबतही यशस्वीने विक्रम केला आहे. यशस्वीने कसोटी कारकीर्दीतील दहाव्या डावात द्विशतक केले आहे. तर करुण नायरने तिसऱ्या, चेतेश्वर पुजाराने नवव्या, सुनील गावस्कर आणि मयंक अगरवाल या दोघांनी आठव्या आणि विनोद कांबळीने चौथ्या डावातच द्विशतक केले होते.

तसेच यशस्वी भारतासाठी द्विशतक करणारा २५ वा फलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांसारख्या माजी दिग्गजांचा समावेश आहे.

 

You Might Also Like

भारत-इंग्लंड संघातील खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी बांधून उतरले मैदानात | BulletsIn
बंगळुरुमध्ये देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार
ठाण्यातील दोन जिम्नॅस्ट खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी | BulletsIn
श्री घंटाळी देवी चषक स्पर्धा : हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल विजयी
ವಿಶ್ವ ಅಥ್ಲೆಟಿಕ್ಸ್ ಕೂಟ: ಶೈಲಿ ಸಿಂಗ್ ಬೆಳ್ಳಿ, ಅಲ್ಡೋಜ್ ಪಾಲ್ ಕಂಚು ಪಡೆದರು | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article प्रोटिनेक्सची नवी जाहिरात, स्वास्थ्याबरोबरच ताकदीचेही महत्त्व सांगणार
Next Article लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?