पुणे 18 नोव्हेंबर (हिं.स.) सिरम इन्सिट्युट ऑफ इंडिया या औषध उत्पादक कंपनीचे चेअरमन सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सायरस पुनावाला (वय ८२) यांच्यावर आम्ही अँजिओप्लास्टी केली आहे.
काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्ध कार्डियॉलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली. तसेच रुबी हॉलचे कॅथलॅब इन्चार्ज डॉ. सी. एन. मखाले यांनी सांगितलं की, पुनावाला यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच ते यातून लवकर रिकव्हर होत आहेत, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे सल्लागार अली दारुवाला यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
