cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > खेलो इंडिया पॅरा गेम्सचे बोधचिन्ह आणि शुभंकर उज्वलाचे अनावरण
Sports

खेलो इंडिया पॅरा गेम्सचे बोधचिन्ह आणि शुभंकर उज्वलाचे अनावरण

CliQ INDIA
Last updated: November 27, 2023 3:00 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

* पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळेच खेलो इंडिया हे नाव घराघरात पोहचले आहे : अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.) : दिव्यांगासाठीच्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे बोधचिन्ह आणि शुभंकर उज्ज्वला यांचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर तसेच अनेक नामवंत खेळाडू आणि पॅरा ऍथलीट्स यांच्या हस्ते करण्यात नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले.

खेलो इंडिया – पॅरा गेम्स 2023 चा अधिकृत शुभंकर म्हणून ‘उज्ज्वला’- एक चिमणी चे अनावरण करण्यात आले. छोटी चिमणी दिल्लीच्या अभिमानाचे प्रतीक आहे आणि तिचे वेगळेपण दृढनिश्चय आणि सहानुभूती दर्शवते. खेलो इंडिया – पॅरा गेम्स 2023 ची शुभंकर उज्वला, आठवण करून देते की शक्ती अनेक रूपात येते आणि मानवी चैतन्य अतूट आहे.

यावेळी उपस्थित खेळाडूंमध्ये, भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल, भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त, भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू सरिता मोर आणि भारतीय व्यावसायिक मुष्टियोद्धा अखिल कुमार उपस्थित होते.

त्याचबरोबर प्रमोद भगत, भाविना पटेल, अवनी लेखरा, सुमित अंतिल या प्रमुख पॅरा ॲथलीट्सच्या उपस्थितीने सोहळ्यात रंगत आणली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक क्रीडा परिसंस्थेच्या कल्पनेबाबत अनुराग ठाकूर म्हणाले, “पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच खेलो इंडिया हे नाव घराघरात पोहचले आहे.ही एक चळवळ बनली आहे आणि गेली काही वर्षे खेलो इंडियामध्ये पॅरा गेम्सचा समावेश नव्हता. 2018 पासून आजपर्यंत आपल्याकडे 11 खेलो इंडिया स्पर्धा झाल्या आहेत, या वर्षी पॅरा गेम्सचा समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे.”

केंद्रीय मंत्री म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून खेलो इंडियासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3,000 कोटी रुपये मंजूर केले होते आणि मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, पुढील पाच वर्षांसाठी त्यात वाढ करून ते 3300 कोटींहून अधिक करण्यात आले आहे.

2018 पासून एकूण 11 खेलो इंडिया स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 5 खेलो इंडिया युवा स्पर्धा , 3 खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धा आणि 3 खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचा समावेश आहे. या खेळांमुळे देशभरातील प्रतिभावंत खेळाडू ओळखण्यात मदत झाली आहे आणि प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यात मदत झाली आहे असे ठाकूर यांनी सांगितले. आता, पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समुळे , पॅरा स्पोर्ट्समध्ये करिअर करण्यास उत्सुक असलेले प्रतिभावान पॅरा अॅथलीट्स निवडता येतील आणि देशासाठी अपेक्षित परिणाम आणण्यासाठी त्यांना आणखी सहाय्य पुरवता येईल.

याप्रसंगी बोलताना, भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांनी सांगितले , “केंद्र सरकार इतका सुंदर उपक्रम घेऊन येत आहे हे पाहून खूप आनंद झाला. या सर्व खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या अनावरण कार्यक्रमानंतर आपला आनंद सामायिक करताना, 2020 उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये पॅरा-बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणारा प्रमोद भगत म्हणाला, “माझा विश्वास आहे की पॅरा गेम्सला विशेषतः युवक आणि पॅरा ऍथलीट्ससाठी खूप आशादायक भविष्य आहे. खेलो इंडियाने सुरू केलेल्या सर्वात महत्त्वाच्या उपक्रमांपैकी हा एक आहे.

सेवा क्रीडा नियंत्रण मंडळासह 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1400 हून अधिक खेळाडू पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे ,ज्यामध्ये पॅरा नेमबाजी, पॅरा तिरंदाजी, पॅरा फुटबॉल, पॅरा फुटबॉल, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा वेट लिफ्टिंग यासह 7 क्रीडा प्रकारांमध्ये पॅरा ऍथलीट्स आपले कौशल्य पणाला लावतील. या स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या 3 स्टेडियममध्ये – इंदिरा गांधी स्टेडियम, तुघलकाबादमधील शूटिंग रेंज आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित केल्या जातील .

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

आशिया कप ट्रॉफी वाद : मोहसीन नक्वीच्या भूमिकेवर बीसीसीआयचा आक्षेप; प्रकरण आयसीसीकडे
पॅट कमिन्स आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज; गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त
ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेत अश्वमेध वेटलिफ्टींग फाऊंडेशनच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
आयपीएल २०२६: हर्षित राणाच्या जागी केकेआरने नवदीप सैनीला संघात घेतले
आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत – आबिटकर | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article गुरू नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
Next Article आयसीएफटी-युनेस्को-इफ्फी भागीदारी हा गांधींचे कालातीत आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न : सर्ज मिशेल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?