ठाणे, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : वेटलिफ्टींग असोसिएशन ठाणे व एबी फिटनेस क्लब, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे जिल्हा स्तरीय युथ, ज्युनिअर, सीनिअर मुले, मुली वेटलिफ्टींग स्पर्धा २०२३ नुकतीच एबी फिटनेस क्लब, बदलापूर येथे पार पडली. अश्वमेध वेटलिफ्टींग फाऊंडेशनच्या 30 खेळाडूंनी सहभागी होऊन 27 सुवर्ण पदके, 15 रजत पदके व 12 कांस्य पदके मिळविली. तसेच माही बाभूळकर हिने यूथ गटाचा सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टींरचा बहुमान मिळवला.
या स्पर्धेत मुलींमध्ये वेदिका टोळे : तीन सुवर्णपदक युथ, जुनिअर, सीनियर;माही बाभुळकर : तीन सुवर्णपदक युथ, जुनिअर, सीनियर;ग्रीष्मा थोरात तीन : सुवर्णपदक युथ, जुनिअर, सीनियर;केतकी पाटील : दोन सुवर्णपदक जुनिअर, सीनियर;श्रुती मोरे : दोन सुवर्णपदक जुनिअर, सीनियर;प्रांजली पगारे : दोन सुवर्णपदक जुनिअर, सीनियर;आरती दाडमोडे : एक सुवर्णपदक जूनियर आणि एक रौप्य पदक सीनियर आर्या इब्रामपूरकर : दोन रौप्य पदक ज्युनिअर सीनियर;यशश्री बेंडले : एकदा रौप्य पदक एक कांस्य पदक यूथ जूनियर;साई जुंद्रे : एक रौप्यपदक सीनियर;प्राजक्ता पानसरे : एक रौप्य पदक;नील सोनवणे : एक कांस्यपदक ज्युनिअर यांनी पदक पटकावले.
मुलांमध्ये प्रणव मुळे : दोन गोल्ड ज्युनिअर सीनियर; प्रणव आंब्रे : दोन गोल्ड ज्युनिअर सीनियर ; हेमंत गुप्ता : एक गोल्ड सीनियर ; अक्षय वाळके : एक गोल्ड सीनियर दीपक गावणकर : एक गोल्ड सीनियर ; अर्णव पवार : दोन गोल्ड एक सिल्वर युथ जुनिअर सीनियर; शिवतेज पवार : एक गोल्ड दोन सिल्वर युथ जुनिअर सीनियर ; हार्दिक लबडे : दोन सिल्वर जुनिअर सीनियर ; कबीर सोनावणे : एक गोल्ड जुनियर एक सिल्वर युथ ; अथर्व आंब्रे : एक सिल्वर एक कास्यपदक युथ जुनियर ; हेमंत यादव : एक सिल्वर एक कास्यपदक ज्युनिअर सीनियर ; आदित्य चोहाण : दोन कास्यपदक ज्युनिअर सीनियर ; सोहम कळंबटे : एक कास्यपदक ज्युनिअर ; अर्णव चौधरी : एक कास्यपदक युथ ; बीनय मंडल : एक कास्यपदक सीनियर ; प्रसाद कडव : एक कास्यपदक सीनियर ; अर्णव चौधरी : एक कांस्यपदक या स्पर्धकांनी पदकांची कामे केली
हिंदुस्थान समाचार
