नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरू नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना, विशेषत: शीख बंधु आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते.
गुरू नानक देवजी यांची शिकवण समता आणि निःस्वार्थ सेवेचे मूल्य सांगते.
मानवतेची सेवा म्हणजे ईश्वर सेवा, यावर गुरू नानक देवजी यांचा विश्वास होता. त्यांनी लोकांना प्रेम, शांती आणि करुणा या मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा दिली. गुरु नानक देवजी यांनी ज्ञानाचा प्रकाश पसरवला, आपल्या उत्कृष्ट कविता आणि शब्द यामधून त्यांनी लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला.
आपण आपले विचार, वाणी आणि कृतीमधून त्यांच्या शिकवणुकीचे पालन करूया आणि समता, बंधुता आणि सलोख्यासाठी स्वतःला समर्पित करूया.”
हिंदुस्थान समाचार
