दुबई, 17 जुलै (हिं.स.)
आयसीसीने टी-२० रँकिंग सिस्टीम अपडेट केली आहे. यासोबतच २०२४ मध्ये
या फॉरमॅटमधून निवृत्त होणाऱ्या विराट कोहलीने एक अनोखा विक्रम केला. तिन्ही
फॉरमॅटमध्ये ९०० पेक्षा जास्त रेटिंग पॉइंट्स मिळवणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू
ठरला आहे. विराटचे टी-२० मध्ये सर्वोत्तम रेटिंग पॉइंट्स ८९७ होते.जे आता ९०९
पर्यंत वाढले आहेत. २०१४ मध्ये त्याने हे पॉइंट्स मिळवले होते.जे रँकिंग सिस्टीम अपडेट झाल्यानंतर
वाढले आहे. २०१८ मध्येच विराटने कसोटीत ९३७ आणि एकदिवसीय सामन्यात ९०९ रेटिंग
पॉइंट्स मिळवले आहेत.या वर्षी १२ मे रोजी विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला
होता. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नाही. आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत तो सध्या
चौथ्या क्रमांकावर आहे.
२९ जून २०२४ रोजी विराटने टी-२०
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावा केल्या. संघ जिंकल्यानंतर
विराटने टी-२० मधून निवृत्ती घेतली. आयसीसी दरवर्षी आपल्या रँकिंग सिस्टीममध्ये
काही बदल करते. यामुळे अनेक क्रिकेटपटूंच्या रँकिंगमध्ये थोडा बदल होतो. यासह विराटचे गुण ८९७ वरून ९०९ पर्यंत वाढले.ज्यामुळे त्याने
सर्वात लहान फॉरमॅटमध्येही ९०० पेक्षा जास्त रेटिंग पॉइंट्सचा विक्रम रचला. ७
सप्टेंबर २०१४ रोजी विराटचे ८९७ रेटिंग पॉइंट्स होते. कोहली या फॉरमॅटमध्ये सलग
१२०२ दिवस नंबर-१ फलंदाजही आहे. ९०९ गुण मिळवल्यानंतर तो टी-२० इतिहासातील
सर्वोत्तम रेटिंग पॉइंट्स मिळवणारा तिसरा फलंदाज बनला. इंग्लंडचा डेव्हिड मलान ९१९
गुणांसह पहिल्या स्थानावर आहे आणि भारताचा सूर्यकुमार यादव ९१२ रेटिंग पॉइंट्ससह
दुसऱ्या स्थानावर आहे.
२०१८ मध्ये विराट कोहली पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-१
फलंदाज बनला होता. त्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये ५९३ धावा केल्या. या दौऱ्यानंतर
विराट ९३७ गुणांसह नंबर-१ कसोटी फलंदाज बनला. या काळात विराटला एकदिवसीय
सामन्यांमध्ये ९०९ रेटिंग गुणही मिळाले होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
