लंडन, 5 ऑगस्ट, (हिं.स.) भारताने
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २-२ अशी बरोबरीत सोडवली.
मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक गोलंदाजी आणि शुभमन गिलच्या
नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटची कसोटी ६ धावांनी जिंकली.पण या संपूर्ण मालिकेत भारतीय संघातील काही
चेहरे असे होते जे सतत संघासोबत राहिले.नेटमध्ये घाम गाळला पण त्यांना अंतिम अकरा क्रिकेटपटूंमध्ये संधी
मिळाली नाही.
अभिमन्यू
ईश्वरन गेल्या अनेक वर्षांपासून भारत ‘अ’ संघासोबत दौरा करत आहे. त्याने देशांतर्गत
क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. आणि भारत ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून परदेशातही
त्याने चमकदार कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये पहिल्यांदाच त्याला टीम इंडियाच्या
कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याचे पदार्पण अजूनही प्रतीक्षेत आहे. इंग्लंड
दौऱ्यावर तो राखीव सलामीवीर म्हणूनही संघात होता. पण यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल
यांच्या चांगल्या फॉर्ममुळे त्याला संघात स्थान मिळाले नाही.
रवींद्र
जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीने संपूर्ण मालिकेत गोलंदाजी केली. पण कुलदीप यादवसारख्या अनुभवी चायनामन
फिरकी गोलंदाजाला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. रविचंद्रन अश्विन बाहेर असूनहीकर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम
गंभीर यांनी कुलदीपकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक सामन्यापूर्वीयावेळी कुलदीपला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा तरी
संघात समावेश करण्यात आला. क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर कुलदीपला
खेळण्याची संधी मिळाली असती तर मालिका भारताच्या बाजूने झुकली असती.
वेगवान
गोलंदाज जसप्रीत बुमराहला कामाच्या तणावामुळे तीन कसोटी सामने खेळावे लागले. अशा
परिस्थितीत अर्शदीप सिंगला कसोटी पदार्पणाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण संघ संयोजन आणि खेळपट्टीच्या
परिस्थितीमुळे त्याला संपूर्ण दौऱ्यात बेंचवरच बसावे लागले. या तरुण डावखुऱ्या
वेगवान गोलंदाजाची प्रतिभा कोणापासून लपलेली नाही. पण अर्शदीप ओव्हलमधील शेवटच्या
कसोटीपर्यंत वाट पाहत राहिला.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
