cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > राजाराम साळवी ‘जनस्वराज्य समाज रत्न २०२६’ पुरस्काराने सन्मानित
Regional

राजाराम साळवी ‘जनस्वराज्य समाज रत्न २०२६’ पुरस्काराने सन्मानित

CliQ INDIA
Last updated: February 22, 2026 6:33 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
राजाराम साळवी यांच्या भरीव सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते 'जनस्वराज्य समाज रत्न २०२६' या मानाच्या पुरस्काराने सन्मानित

ठाणे, 21 फेब्रुवारी, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती ठाण्यातील खारेगाव (९० फूट रोड) येथे ‘जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट’च्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. ठाणे शहरातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला हजारो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली.

आरोग्य शिबिर आणि कलागुणांना वाव

सकाळी शिवरायांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन या मंगलमय सोहळ्याची सुरुवात झाली. या निमित्ताने परिसरातील नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री आरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २०० हून अधिक नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घेतला. तसेच, बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

शिवमय मिरवणूक आणि ‘शिवाजी राजा माझा’

सायंकाळी शिवताल ढोल पथकाच्या निनादात आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण खारेगाव परिसर शिवमय झाला होता. यानंतर समीर दळवी आयोजित ‘शिवाजी राजा माझा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात गाणी आणि पोवाडे सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लोकव्याखानकार प्रा. विशाल गरड यांच्या शिवचरित्र- जीवनाचे सुत्र ह्यावरील व्याखानाने झाला.

१२ किल्ल्यांच्या माहितीपटाचे सादरीकरण

कार्यक्रमाचे एक प्रमुख शैक्षणिक आणि ऐतिहासिक आकर्षण म्हणजे आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला विशेष माहितीपट. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या १२ किल्ल्यांचा इतिहास ऑडिओ-व्हिज्युअल आणि इन्फो-वॉलच्या माध्यमातून उलगडण्यात आला. विशेष म्हणजे, या अभ्यासपूर्ण माहितीपटाचे संकलन आणि लेखन केबीपी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे यांनी केले, ज्याला प्रा. संभाजी शेळके आणि ॲड. मनोज बडगुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

‘जनस्वराज्य समाज रत्न’ पुरस्काराचे वितरण

या सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक श्री. राजाराम साळवी यांच्या भरीव सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘जनस्वराज्य समाज रत्न २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, ‘प्रत्येकाने दुर्गसेवक होऊन आपल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करावे’, असा मोलाचा संदेश आमदार संजय केळकर यांनी दिला.

मान्यवरांची उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्याला ठाण्याचे उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, ॲड.संदिप लेले, श्री. दशरथ पाटील, नगरसेवक श्री संजय वाघुले, श्री. मनोहर डुंबरे, ॲड. सौ. अनिता गौरी, विजया लासे, श्री. मंदार केणी, विकास पाटील व श्री सचिन मोरे, विजय पाटील, नरेंद्र शिंदे, विजय शिंदे, उमेश पाटील, विलास साठे, विक्रम भोईर यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजन पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री. मंजित जाधव, अमित नाईक, किरण पाटील, जगदीश पाटील, सुनिल पाटील, हेमंत पाटील, प्रशांत तळवडेकर, नितीन बुबेरा, धनंजय परब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. शेवटी, या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल अध्यक्ष राजन पाटील यांनी सर्व मान्यवर आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या ठाणेकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

सोलापूर : रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भरणार जनावरांचा बाजार
निवडणूक पार पडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखावा – धुळे जिल्हाधिकारी
पुणे : 'महाराष्ट्राचा बौद्ध वारसा' विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
पर्यावरण संवर्धन अन् आपत्ती व्यवस्थापन आराखडा होणार अधिक परिपूर्ण – ठाणे जिल्हाधिकारी
मराठा विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्त्वावर वसतिगृह घेणार- अजित पवार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची नियुक्ती
Next Article भाजपाच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस मुख्यालयाबाहेर आंदोलन; अनेक कार्यकर्ते ताब्यात
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?