cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > ठाणे पूर्व पश्चिम जोडणारा बंद केलेला पादचारी पुल सुरू करा – खा. राजन विचारे
Regional

ठाणे पूर्व पश्चिम जोडणारा बंद केलेला पादचारी पुल सुरू करा – खा. राजन विचारे

CliQ INDIA
Last updated: November 29, 2023 5:00 am
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

ठाणे, 28 नोव्हेंबर, (हिं.स.) ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम बाजूस वसलेल्या चेंदणी कोळीवाड्यातील वसाहतीतील नागरिकांच्या दररोज वापरात असलेला पादचारी पुल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी दिलेल्या अहवालानुसार मध्य रेल्वेने सदर पूल धोकादायक झाल्याने अचानक बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण होऊन येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याने खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेऊन या पुलाचे महत्व पटवून दिले. त्यावेळी जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, कृष्णकुमार कोळी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब चे सदस्य दीपक तांडेल, सुरेंद्र कोळी, आनंद कोळी उपस्थित होते.

भारतातील पहिली रेल्वे सुरू झालेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेवर चेंदणी कोळीवाडा हे गाव वसलेले होते. रेल्वे सुरू झाल्यानंतर या गावा मधून रेल्वे लाईन टाकण्यात आली व ही गावे पूर्व व पश्चिम बाजूस विभागले गेले व इसवी सन १९३२ साली चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पंचांनी त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून पुल उभारण्यात आला होता. या पुलाची शासन दरबारी चेंदणी बंदर रेल्वे पूल अशी नोंद आहे. कालांतराने ठाणे वाशी रेल्वे मार्ग विकसित झाला. त्यावेळी ब्रिटिश कालीन जुना पूल तोडून त्या ठिकाणी या विस्तारित कोळीवाड्यांसाठी मध्य रेल्वेने पूल उभारण्यात आला होता या पुलाला आज पंधरा वर्षे झाली आहेत.

याच पुलावरून दररोज बाजारात जाणाऱ्या महिला शाळा महाविद्यालय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक या पुलाचा वापर करीत असतात तसेच या कोळीवाड्यातील पारंपारिक उत्सव व उत्सवाच्या पालख्या तसेच गावातील काही अंत्ययात्रा याच पादचारी पुलावरून होत असतात त्यामुळे या पुलाचे महत्त्व अधिक असल्याने हा पूल सुरू करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना केली आहे.

त्याचबरोबर खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रेल्वे मार्फत कल्याण व मुंबई दिशेस नवीन पुलाचे काम सुरू आहे परंतु निधी अभावी आपण काम थांबऊ नका निधीच्या उपलब्धतेसाठी आयुक्त अभिजीत बांगर यांना पुन्हा पत्रव्यवहार करून मी पाठपुरावा करीत आहे लवकरच आपणास निधी उपलब्ध होईल अशी अश्या व्यक्त करून आपण पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करा तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रबंधकांना नागरिकांची गैरसोय दूर करावी असे सांगितले त्यावर रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांनी ती मान्य करून धोकादायक ठरलेला पुलाच्या फरशा काढण्यात आलेल्या आहेत. त्याची डागडुजी करून सात दिवसानंतर पुल एक ते दीड महिन्याकरिता सदर पूल खुला करून तोडण्यात येईल तोपर्यंत महापालिकेकडून निधी उपलब्ध झाल्यास लवकरात लवकर नवीन पुलाचेही बांधकाम पूर्ण करू असे सांगण्यात आले. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून जाण्याची मुभा देण्याच्या सूचना रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल आपल्या स्तरावरून अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच खासदार राजन विचारे यांनी ठाणे मुलुंड दरम्यान होणारा नवीन रेल्वे स्थानक तसेच ठाणे कोपरी पूर्वेस होत असलेला सॅटिस २ प्रकल्प व त्याचबरोबर आरएलडीए मार्फत ठाणे रेल्वे स्थानक मल्टी मॉडेल हब याचे काम सुरू करण्यासाठी विस्तृत चर्चा त्यावेळी केली ठाणे रेल्वे स्थानकातील वारंवार बंद पडणारे सरकते जिने, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, तिकीट खिडकी, शौचालयाची स्वच्छता, शुद्ध पाणी मिळण्याकरिता वॉटर वेंडिंग मशीन याबाबतही चर्चा करून रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा देण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसेच मध्य रेल्वेने ११ जानेवारी २०२३ रोजी मध्य रेल्वे व मेयर विटा बायोटेक या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या थाटामाटात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले होते त्यावेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वे हे वसाहत कार्यालय रुग्णालय व अन्य संस्थांना मधून दररोज निर्माण होणाऱ्या ४५ किलो लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी वापरात आणणार असे सांगण्यात आले होते परंतु हा प्लांट अद्याप सुरू केलाच नाही कारण त्याला जोडणाऱ्या ड्रेनेज व पाईपलाईन याचे काम कोण करणार याचाच निर्णय घेता घेता सहा महिने घालवले अखेर मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन ड्रेनेज व पाईपलाईन चे काम सुरू केले आहे. खासदार राजन विचारे यांनी यावर नाराजगी दाखवून या संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त रजनीश गोयल यांच्याकडे केली आहे.

जनतेच्या पैशातून उभे केलेले दिघा गाव रेल्वे स्थानक जनतेसाठी उपयोगात येऊ द्या नाहीतर नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल खासदार राजन विचारे यांचा मध्य रेल्वे मुख्य प्रबंधकांना इशारा

प्रतिनिधी – गेल्या सात महिन्यापासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली दीघा गाव व ऐरोली रेल्वे स्थानकात नागरिकांनी केलेल्या स्वाक्षरी व त्यांच्या प्रतिक्रिया नुकताच मध्य रेल्वे मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्त केल्या तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही नागरिकांनी केलेल्या स्वाक्षऱ्या व प्रतिक्रिया पाठविण्यात आल्या आहेत. जनतेच्या पैशातून उभे केलेले दिघा गाव रेल्वे स्थानक जनतेसाठी उपयोगात येऊ द्या नाहीतर नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा देण्यात आला.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

कोल्हापूर : ‘गौरव मायमराठीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमाला पर्यटक, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती | BulletsIn
नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे – छाजेड
संवर्ग नसताना देविदास पवार यांची अमरावती मनपा नियमित आयुक्तपदी वर्णी
रामभक्त, कारसेवक शालिनी डबीर यांचा संघ-भाजपाकडून विशेष सन्मान
फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
Next Article उत्तराखंड : सर्व 41 कामगारांची सुखरूप सुटका
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?