संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह वरिष्ठ नेते येणार
नाशिक, 19 ऑक्टोबर : नाशिक मध्ये सापडलेल्या अमली पदार्थाच्या विरोधात आता शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवारी निघणाऱ्या मोर्च्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या मोर्चासाठी मुंबईहून शिवसेनेचे नेते नाशकात दाखल होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून शिवसेनेचा भव्य आणि दिव्य असा मोर्चा होणार आहे.
नासिक मध्ये मागील पंधरा दिवसांपूर्वी सापडलेल्या शिंदे गावातील ड्रग फॅक्टरी नंतर आता या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या ललित पाटील हा देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पाटील यांनी अनेक गुप्त माहिती सांगण्यासाठी लवकरच तो माहिती देणार आहे असे सांगितले जात आहे दरम्यान शिवसेनेच्या वतीने यापूर्वी पुकारण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा हा उद्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता शालिमार येथील शिवसेना भवनापासून निघणार आहे त्यानंतर हा मोर्चा गा.म. पुतळा मेन रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे. या मोर्चाच्या तयारी साठी शिवसेनेच्या वतीने मध्य नाशिक सह पंचवटी सिडको सातपूर या परिसरामध्ये बैठका घेण्यात आल्या पोस्टर लावण्यात आले हँडबिल वाटण्यात आले जेणेकरून अधिकाधिक नागरिकांनी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावे या याचा प्रयत्न केला गेला तसेच शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल, बबनराव घोलप, दता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते माझी महापौर विनायक पांडे, यांच्यासह विविध नेते या बैठकांना उपस्थित होते. या मोर्चाची तयारी त्याचा अंतिम टप्प्यात आली आहे.या मोर्चासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत असणारच आहे परंतु त्यांच्याबरोबर शिवसेना नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुषमा अंधारे विनायक राऊत आधी नेते देखील या मोर्चासाठी नाशकात दाखल होणार आहेत अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे परंतु अजून पर्यंत ज्या नेत्यांच्या येण्याबाबत पक्ष कार्यालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नाशिक मध्ये सापडलेल्या ड्रग फॅक्टरी नंतर आता हे सर्व प्रकरण गंभीर आहे या प्रकरणात जिल्हाधिकारी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस यांनी लक्ष घालने आवश्यक होते. परंतु या सर्व प्रशासनाबरोबरच पालकमंत्री दादा भुसे हे बैठक घेतात आणि दबावाची रणनिती ती करीत आहे ही गोष्ट चुकीची आहे पालकमंत्र्यांनी नैतिकता सांभाळून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा कारण या सर्व प्रकरणांमध्ये पालकमंत्र्यांच्या कुठे ना कुठेतरी संबंध दिसून येत आहे पण आज नैतिकता कुठेच दिसत नाही याची खंत वाटते. – सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख शिवसेना (उबाठा) नाशिक.
