भंडारा १८ ऑक्टोंबर : माकडांचा हैदोस थांबता थांबत नाही आहे. माकडांनी आता गावात आपले वास्तव्य सुरू केले असून घरांचे नुकसान करीत आहेत. आता तर माकडामुळे नागरीकांचे जीव देखिल जात आहेत. घरासमोरील पायरीवर बुट पायात घालत असताना घराच्या छतावरून माकडाने उडी घेतल्याने छतावरील बीट इसमाच्या डोक्यावर पडली अन् त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील रोहनी येथे घडली असून भागवत करानकर (४७) रोहनी असे मृतक इसमाचे नाव आहे. तर कला देखिल लाखांदूर येथे अंगणात उभी असतांना माकडाच्या टोळीने छतावर उडी मारल्याने पॅराफिटची वीट महिलेच्या दोन्ही पायावर पडल्याने इंदिरा गभने (60) ह्या गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहेत.
