* एक वही एक पेन अभियानांतर्गत वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
मुंबई, मार्च :- जीवनात पुढे जाऊन देशाचा आदर्श नागरिक म्हणून मार्गक्रमण करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच महापुरुषांच्या जीवन चारित्राचादेखील आभास करावा असे प्रतिपादन महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष एक वही एक पेन अभियानचे प्रणेते ,जेष्ठ पत्रकार समाजभूषण राजू झनके यांनी केले .
कुर्ला पश्चिम रामदास चौक येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामीण भागातून मुंबईत शिक्षणासाठी वसतिगृहात राहत असलेल्या १०० विद्यार्थ्यांना महामानव प्रतिष्ठानच्या वतीने एक वही, एक पेन अभियानांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्दर्शन करताना झनके म्हणाले कि पालकांनी तुम्हाला ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी मुंबईत पाठविलेले आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी कोणतीही तडजोड न करता शिक्षणात खंड पडू दिला नाही म्हणूंच ते केंद्रीय मंत्री होऊन देशाची घटना लिहू शकले. जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून कोलंबिया विद्यापीठाने त्याचा पुतळा विद्यापीठात आरूढ केला आहे हि तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. संत गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु शिष्यासारखे नटे होते गाडगे बाबाना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अभिमान वाटत होता . गाडगे बाबांनी अनिष्ठ रूढी परंपरेला आपल्या प्रबोधनकारी भजनांच्या माध्यमातून प्रहार करीत जनजागृती केली . छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरोधात उभे राहायला शिकविले . आपल्यातील स्वाभिमान जागृत करून बाराबलुतेदार मावळ्यांना घेऊन उत्कृष्ट राज्यकारभार केला . शालेय अभ्यास करीत असतानाच या तिघांसह देशातील महापुरुषांच्या जीवन चारित्राचा अभ्यास केल्यास एक आदर्श विद्यार्थी आणि देशाचा आदर्श नागरिक घडल्याशीवाय राहणार नाही असे झनके यांनी सांगितले .
महापुरुषांचे जयंती उत्सव महापरिनिर्वाण दीन गणेशोत्सव नवरात्रोत्सव तसेच मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्त समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियान अंतर्गत करण्यात येते .राजू झनके यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला
सदर प्रसंगी गाडगे महाराज विद्यालयात उभारण्यात आलेल्या देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिजी महाराज मंदिर उभारल्याबद्दल महामानव प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी शाळेचे संचालक प्रकाश चौधरी यांचा सत्कार करण्यात आला . सदर प्रसंगी विद्यालयाचे संचालक प्रकाश चौधरी,महामानव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व अभियानचे सदस्य राजेश उबाळे राजू लोखंडे ,प्रकाश सोनवणे सम्यक झनके आदी उपस्थित होते..
