सातारा, : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात येथील गुरु आचल घोरपडे यांच्या नटराज नृत्यकला शाळेच्या कलाकारांनी सुमारे दीड तास बहारदार भरतनट्यम नृत्य सादर करून महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी आलेल्या सातारा परिसरातील शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले .
आपल्या या नृत्य कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी चतुश्र एक तालात रागमलिका रागात ..श्लोकम .. ने करीत शुद्ध नर्तन प्रकारातील हम्सधनी रागात मिश्र चापू तालात.. अलारिपू.. सादर केले .त्यानंतर कथक ..अय्यप्पा.. मिरामी मेघ रजनी यांची रचनेचे सुरेख दर्शन दाखवत महिषासुरमर्दिनीचे ..आईगिरी नंदिनी ,नंदित मेदिनी.. हे स्तोत्र रचनेवर सुरेख नृत्य प्रकार सादर केला .त्यानंतर अडाऊ हा या नृत्य प्रशिक्षणातील प्रारंभिक रचना बालकलाकारांनी सादर झाल्यावर गणेश स्तुती आणि ..नटनविशारद.. हे भगवान नटराज वरील आधारित नृत्य सादर झाले. शिवपंचाक्षर स्तोत्रावर सुरेखनृत्य सादर होऊन भगवान श्री रामचंद्र वरील ..रामस्तुति.. सादर करून संत पुरंदरदास यांनी केलेली रचना ..वोडिबा ..व कदन कुतूहल रागातील आदि तालातील तिलाना सादर होत कृष्ण स्तुतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या नृत्य कार्यक्रमात तन्मय पवार ,प्रांजल पवार, मिरा कुलकर्णी, रिया द्विवेदी, तनिष्का सुळ, अनुष्का साळुंखे ,ओवी गायकवाड, अनन्या पोतदार ,काव्या खामकर, सानिका कलानी, ईशानी साबळे, निया बहुवा ,अनन्या चव्हाण, सानवी क्षीरसागर ,श्रेया गाढवे, वेदिका गुरव, केतकी जोशी ,आर्या डांगे, निकिता कोळी, मानसी सदामते या कलाकारांनी आपले नृत्य सादर केले .या सर्व कलाकारांचा सत्कार नटराज मंदिराचे वतीने प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
