रत्नागिरी, 7 ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रत्नागिरी पोस्टल विभागाकडून १० ऑक्टोबर रोजी जालगाव (दापोली) आणि पाली (रत्नागिरी) येथे वित्तीय समावेशन कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.हा वित्तीय समावेशन मेळावा ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.
या मेळाव्यात पोस्ट ऑफिसच्या विविध सुविधांचा लाभ रत्नागिरी विभागातील जनतेला एकाच छताखाली मिळणार आहे. आधारच्या सर्व सुविधा, पीएलआय व आरपीएलआय, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सुविधा, My Stamp, प्रधान मंत्री किसान योजना, गोल्ड बॉन्ड, तसेच पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, मुदत ठेव, आवर्ती ठेव, किसान विकास पत्र अशा विविध योजनांची सुविधा या मेळावाच्या माध्यमातून जनतेस मिळणार आहे.जालगाव आणि पाली येथील व आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या वित्तीय समावेशन कार्यक्रमाला उपस्थित राहून पोस्ट ऑफिसच्या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.
