नाशिक, १५ फेब्रुवारी : शाळेच्या गच्ची वरती इयत्ता आठवीची विद्यार्थिनी धूम्रपान करताना पकडल्या गेल्यानंतर विद्यार्थिनीने भीतीपोटी टेरेसवरून उडी मारल्याने गंभीर जखमी झाली आहे ही घटना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या तिडके कॉलनी परिसरातील एका शाळेमध्ये घडली. याबाबत शाळा व्यवस्थापनाने मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे
यासंदर्भातील माहितीनुसार नाशिक शहरातील मध्यवस्तीत असलेल्या तिडके कॉलनी परिसरातील शाळेच्या गच्चीवरून उडी मारणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे. गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. तिला शाळेच्या परिसरात धूम्रपान करताना शालेय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्याने पाहिले. आपली तक्रार होईल, या भीतीने ती विद्यार्थिनी घाबरली. त्यानंतर काही क्षणात तिने शाळेच्या इमारतीवरून उडी मारली. यात तिचा पाय फॅक्चर झाला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
