रत्नागिरी, 30 जानेवारी, : रत्नागिरी भाजपातर्फे प्रतिमा भेट देऊन करसेवकांचा सन्मान करण्यात आला. करसेवक नीलाताई दाते, रत्नाकर हेगिष्टे, शामकिशोर पांचाळ, श्रीनिवास पटवर्धन, शिल्पाताई पटवर्धन, विद्या विजय वाढ्ये, यशवंत आत्माराम धुपकर, संजय केशव पटवर्धन या करसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहर अध्यक्ष राजन पटवर्धन, दादा ढेकणे, संदीप सुर्वे, संकेत कदम, लीलाधर भडकमकर, मंदार मयेकर, योगेश हळदवणेकर, शैलेश बेर्डे, सौ. वर्षा ढेकणे आदी उपस्थित होते.
यावेळी करसेवकांनी आपल्या भावना उत्स्फूर्तपणे मांडल्या. तेव्हा करसेवक भावुक झालेले पाहायला मिळाले. मागील अनेक शतकांची प्रतिक्षा पूर्ण झाली आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले. मोदी यांच्या इच्छाशक्तीमुळेच अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा नव्याने होऊ शकली. आज इतक्या वर्षांनंतर रामाची प्रतिष्ठापना होऊन भव्य दिव्य राम मंदिर उभे राहिले आहे आम्हाला याचा अतिशय आनंद आहे. आम्ही दिवसभर हा सोहळा टीव्हीवर पाहत होतो. आम्हाला भरून पावल्यासारखे झाले. आज इतक्या वर्षांनी आम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले, याचा अत्यंत आनंद आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
