नाशिक, १२ नोव्हेंबर – नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शासकीय योजना लाभार्थींचा मतदारसंघ म्हणून सर्वांना परिचित आहे.
आमदार सीमा हिरे यांच्या सातपूर व सिडको येथील जनसंपर्क कार्यालयामधून शासकीय योजनांचे स्वतंत्र कक्ष आहे. याचा लाभ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या अनाथांना व निराधारांना होत आहे. सन 2020- 21 या वर्षाचा काळ हा कोरोना काळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये अनेक कुटुंबीयांनी आपल्या घरातील कुटुंबकर्त्या व्यक्तींना गमावलेल आहे.
या अतिशय खडतर काळामध्ये आमदार हिरे यांच्या कार्यालयामधून मतदारसंघांमध्ये पीडित कुटुंबियांचे शासनदरबारी वैयक्तिक लाभ योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्याकरता व लाभ मिळवून देण्याकरता प्रयत्न केले. त्याचबरोबर दिव्यांग, मतिमंद, गतिमंद या घटकातील व्यक्तींना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागाकडे वर्ग केले. विधवा महिला व जेष्ठ नागरिक यांचे प्रस्ताव संजय गांधी योजना व श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजनेकरता वर्ग केले. आजपावतो कोरोना काळात आई किंवा वडील गमावलेल्या मतदार संघातील एकूण 338 मुलांना बालसंगोपन व बालनिध योजनेअंतर्गत प्रत्येक मुलास 36 हजार रुपये अनुदान या आर्थिक वर्षात यशस्वीपणे प्राप्त झाले आहे.
तसेच संजय गांधी श्रावण बाळ योजनेअंतर्गत तीनशे पेक्षा अधिक व्यक्तींचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यांना दिवाळी मध्ये प्रत्येकी रक्कम रुपये 1500/- अर्थसहाय यशस्वीपणे लाभार्थींना मिळाले आहे. मतदार संघातील 200 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींना दरमहा र. रुपये 3000/- मिळाले आहे यामुळे या प्रवर्गातील नागरिकांची दिवाळी आमदार हिरे यांच्या प्रयत्नांमुळे गोड झाली आहे.यामुळे मतदारसंघात चालू आर्थिक वर्षात तीन कोटीपेक्षा अधिक रक्कम अनाथ, निराधार व दिव्यांगांना आमदार हिरे यांच्या कार्यालयांच्या माध्यमातून मिळणार आहे. यामुळे सातपूर व सिडको परिसरामध्ये समाधानाच वातावरण दिसत आहे.
