नागपूर, 13 डिसेंबर (हिं.स.) – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना!, अशा शब्दात अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
नभोवाणी, नाट्यक्षेत्र या क्षेत्रांतील कामाबरोबरच मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभियनाने एक वेगळे स्थान निर्माण केले. ३०० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमधून तसेच काही हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे एक दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला असल्याचेही ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
