cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > कोमसापच्या माॅरिशस येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर
Regional

कोमसापच्या माॅरिशस येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर

CliQ INDIA
Last updated: November 27, 2023 1:00 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा !

ठाणे, २७ नोव्हेंबर (हिं.स.) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २ व ३ डिसेंबर रोजी १७ वे केंद्रीयस्तरावरील साहित्य संमेलन अर्थात आंतरराष्ट्रीयस्तरीय ‘हृदयगंम – मराठी साहित्य संमेलन’ माॅरिशस येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखक, संपादक, पत्रकार विजय कुवळेकर हे भूषविणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.प्रदीप ढवळसर यांनी दिली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक मधूभाई मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत माॅरिशस येथे होणाऱ्या या कोमसाप आंतरराष्ट्रीयस्तरीय ‘हृदयगंम – मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर हे करणार आहेत. तर स्वागताध्यक्षपदी माॅरिशस देशाच्या निशा हिरु या असणार आहेत. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनानिमित्ताने, कोमसाप पाचूचे बेट- माॅरिशस ही स्मरणिकाही प्रकाशित करणार आहे. कोमसापच्या आंतरराष्ट्रीयस्तरीय ‘हृदयगंम – मराठी साहित्य संमेलना’च्या या उपक्रमात महाराष्ट्र सरकार कोमसापच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, अशा शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचेही प्रा.डाॅ.प्रदीप ढवळसर यांनी सांगितले.

कोमसापच्या या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाला कोकणातून जवळपास १२५ मान्यवर साहित्यिकांचा सहभाग असणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत माधव गडकरी यांनी १९९२ साली आयोजित केलेले, मॉरिशस देशातील पहिले आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन माॅरिशसच्या शीला बापू यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले होते. आज ३२ वर्षांनी माॅरिशस येथे होणारे कोमसापचे आंतरराष्ट्रीय ‘हृदयगंम – मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखक, संपादक, पत्रकार मा. विजय कुवळेकर हे भूषविणार आहेत. साहित्य संमेलन आयोजित करण्याचा ३२ वर्षापूर्वीचा तोच सन्मान मॉरिशस येथील मराठी मंडळाच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे मॉरिशसमधील भारतीय व मराठी वंशीय लोकप्रतिनिधींचा या संमेलनासाठी सक्रिय सहभाग लाभलेला आहे. हिंदी महासागरात आफ्रिकेजवळ वसलेला टिकली एवढा देश म्हणजे मॉरिशस. लोकसंख्या १०-१२ लाख. म्हणजे आपल्या सोलापूर औरंगाबाद एवढी. आपल्या निसर्ग सुंदर बीचेससाठी प्रसिद्ध असलेल्या मॉरिशस बेटावर गेल्यावर अनेक मराठी भाषिक लोक आपल्याला भेटतात. माॅरिशस देशाच्या १० ते १२ लाख लोकसंख्येत ५२ टक्के लोकसंख्या ही, हिंदू धर्मीय व १८ टक्के लोकसंख्या ही मराठी भाषिक आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातुन माॅरिशस देशामध्ये गेलेल्या मराठी माणसांनी गेल्या दोन-अडीचशे वर्षात, अनेक मराठी भाषिक पिढ्यांनी आपली मुळ भाषा ‘मराठी’ ही जपलेली आहे, असाही संदर्भ प्रा.डाॅ.प्रदीप ढवळसर यांनी दिला.

विजय कुवळेकर यांचा परिचय

२२ जानेवारी १९५२ रोजी जन्मलेले विजय कुवळेकर यांनी सकाळ, लोकमत यांसारख्या वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले आहे. अलीकडे काही काळ त्यांनी ‘झी २४ तास’ या मराठी वृत्तवाहिनीचे आणि ‘झी मराठी दिशा’ या साप्ताहिकाचे मुख्य संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. ते राज्याचे माहिती आयुक्त होते आणि अभ्यासू वक्ते, लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘सातच्या आत घरात’सारख्या काही चित्रपटांचे लेखन केले आहे. ‘रावसाहेब’ हा चित्रपट त्यांनी लिहिला होता. त्याला राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. कथा, पटकथा, संवाद व गीते असे लेखनासाठीचे चारही राज्य पुरस्कार कुवळेकर यांना मिळाले होते. एकाच लेखकाला एकाच चित्रपटासाठी असे चारही लेखनपुरस्कार मिळण्याची मराठी चित्रपट क्षेत्रातली ही एकमेव घटना. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका मालिकेत त्यांनी सावरकरांची भूमिकाही केली होती. तसेच ‘पैलू’साठी त्यांना राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. बडोद्यात २०१४मध्ये झालेल्या २६व्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

निवडणूक पार पडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखावा – धुळे जिल्हाधिकारी
बाळासाहेब थोरात यांची शिवसेनेच्या यादीवर नाराजी
नव्या पिढीकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता टिकणार नाही- शरद पवार
पुणे – विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण | BulletsIn
गणपतीपुळे येथे व्हेल मासा बचाव मोहीम यशस्वी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article भारताबाबत उद्योजकांमध्ये असलेल्या आशावादाची पंतप्रधानांकडून दखल
Next Article गुरू नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?