सोलापूर 9 डिसेंबर ( हिं.स)
बनावट खरेदीदस्ताद्वारे दुसऱ्या्या प्रॉपर्टीवर स्वत:चे नाव लावून जागा मालकासह शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी महम्मद सलीम अ. करीम कल्याणी (रा. १५० बेगम पेठ, सोलापूर) या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदला आहे.या प्रकरणी जागामालक अंबादास व्यंकटेश चव्हाण (६२, म्युन्सिपल कॉलनी, रेल्वेलाईन सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ फेब्रुवारी २०२० ते आजतागायत दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी उत्तर सोलापूर) येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी अंबादास व्यंकटेश चव्हाण यांच्या मालकीचा मजरेवाडी येथील अंत्रोळीकर नगर भाग-२ मधील प्लॉट नं ६४, यासी जुना सन २७१/१ व २७३/२ यासी नवीन सर्व्हे नं १७/२ या मिळकतीसंबंधी महम्मद सलीम अ.करीम कल्याणी यांच्याशी कोणताही व्यवहार केलेला नव्हता, असे अंबादास चव्हाण यांनी सदर बझार पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार
