अहमदनगर, 17 ऑक्टोबर, (हिं.स.) : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न वैभव ढाकणे सातत्याने सोडवत आहेत.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यत पोहोचवण्याचे काम करत आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्या प्रशासकीय पातळीवर सोडवण्याचे काम करत असून विद्यार्थ्यांचे संघटन केले आहे.विद्यार्थी चळवळीत वैभव ढाकणे यांचे चांगले काम असल्याचे प्रति पादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी वैभव ढाकणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आ.संग्राम जगताप यांनी सत्कार केला.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी वैभव ढाकणे यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी वैभव ढाकणे यांच्या निवडीचे पत्र दिले आहे.
हिंदुस्थान समाचार
