cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > एस टी महामंडळ नफ्यात, ही शिंदे सरकारच्या प्रशासकीय कौशल्याची पावती – उदय सामंत
Regional

एस टी महामंडळ नफ्यात, ही शिंदे सरकारच्या प्रशासकीय कौशल्याची पावती – उदय सामंत

CliQ INDIA
Last updated: October 18, 2023 2:33 am
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.) आपल्या महाराष्ट्राचा परिवहन विभाग, ज्याचे मंत्री खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, या विभागात असलेले एसटी महामंडळ, जे वर्षानुवर्षे तोट्यात चालणारे आणि कधीही नफ्यात न येणारे मंडळ अशी ख्याती होती. परंतु घरात न बसता, प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले तर एखाद्या महामंडळात किंवा एखाद्या विभागात काय चमत्कार होऊ शकतो, हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने दाखवून दिले आहे. देशामध्ये फक्त सहा राज्यांमधील एसटी महामंडळे ही फायद्यात चालली आहेत, बाकी सर्व तोट्यात सुरु आहेत. मुळात एसटी महामंडळ हे स्वतंत्र रित्या चालणारे महामंडळ आहे. महाराष्ट्र शासनाकडून काही वेळा त्यांना आर्थिक मदत केली जाते. परंतु मागील २-४ वर्षांत कोविड काळात व त्याच्या अगोदर व्यवस्थितरित्या लक्ष न दिल्याने हे महामंडळ तोट्यात चालले होते. अगदी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके देखील एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीतून महामंडळाला सावरणे, ही मोठी कसरत होती. पण अशा बिकट परिस्थितीतून शिंदे-फडणवीस व पवार सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरीत्या बाहेर काढले. वर्षानुवर्षे तोट्यात असलेले एसटी महामंडळ नफ्यात आणून, सक्षम व सकारात्मक पद्धतीने काम करण्याची इच्छा असेल तर एखाद्या तोट्यात असलेल्या संस्थेचाही कायापालट करता येतो, हे राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारने दाखवून दिले आहे, असे विधान शिवसेनेचे उपनेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केले.

उदय सामंत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एसटीचा तोटा अधिकाधिक वाढत चालला होता. कोविड काळात लॉकडाऊन दरम्यान वाहतूक पूर्ण बंद असल्याने मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळात एसटीचं ६३०० कोटींचं उत्पन्न बुडाले होते. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देखील थकले होते. तेव्हा राज्य शासनाला वेळोवेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक मदत द्यावी लागत होती. पूर्वीच्या सरकारमध्ये असताना अजित पवार अर्थमंत्री असताना महिना ३०० कोटी रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर, मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची भरपाई सरकारकडून एसटी महामंडळाला १०० कोटी रुपये देण्यात आले. तर याच अधिवेशनात महिलांना एसटी प्रवासामध्ये तिकीट दरांमध्ये ५०% सवलत देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. यासाठी महामंडळाला सरकारकडून परिपूर्तीसाठी १८० कोटी रुपये देण्यात आले. तसेच ६० ते ७५ पर्यंत वय असलेल्या नागरिकांना एसटीमध्ये ५०% तिकीट सवलत निर्णय जाहीर करण्यात आला. त्यासाठी सुद्धा २६ कोटी रक्कम सरकारकडून महामंडळाला देण्यात आली. हे सर्व निर्णय ऐतिहासिक होते. कारण शासनाच्या या निर्णयांमुळे एसटीच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्ती पोटी शासनाला द्यावी लागणारी रक्कम ३०० ते ३५० कोटी एवढी झाली. राज्यात एसटी महामंडळाचे ३१ विभाग आहेत. हे सर्व विभाग पूर्वी नुकसानीत होते. शासनाच्या या निर्णयांमुळे यातील १८ विभाग हे नफ्यामध्ये आले आहेत. यातील बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर, परभणी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर तर जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. बीडमध्ये एसटी महामंडळाला ३.५ कोटी रुपयांचा, परभणी मध्ये ३ कोटी रुपयांचा, तर जळगावमध्ये २ कोटी ९० लाख रुपयांचा नफा एसटी महामंडळाला झाला आहे. यात नुसते एसटी महामंडळाचे १८ विभाग नफ्यात आले नाहीत, तर एसटी बस देखील आधुनिकतेकडे वळली पाहिजे म्हणून गेल्या वर्षभरात महामंडळाने १५० इलेक्ट्रिक बसेस, तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात ५०-५० मिनी बसेस, गेल्या वर्षभरात नवीन सातशे डिझेल बस, पाचशे भाडेतत्त्वावरील बस ताफ्यात आणल्या आहेत. जुलै २०२३ अखेर पर्यंत एसटीकडे १६ हजार २३३ गाड्या असून त्यातील १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या नऊ हजार ७५८ गाड्या आहेत. फक्त नफा मिळतोय म्हणून एसटी महामंडळ थांबले नाही, तर नागरिकांना नव्या गाड्या कशा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाने प्रामाणिक प्रयत्न सुरु केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाला द्यावे लागणारे अनुदान हळूहळू कमी होत ते शून्यावर आले आहे. याचा अर्थ एसटी स्वतः आपला खर्च भागवू लागली आहे. तोट्यात असलेले एसटी महामंडळ पुन्हा ऊर्जावस्थेत आणून, एसटीचे खाजगीकरण होऊ नये, अशी जी कर्मचाऱ्यांची मागणी होती, त्या दृष्टीने टाकलेले हे मोठे पाऊल आहे. कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या देखील शिंदे फडणवीस पवार सरकारने मान्य केल्या. ज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता ४२% ने वाढवणे, १०,००० रुपये असलेला भत्ता १२,५०० करणे, अशा सर्व मागण्यांना एकनाथ शिंदे यांनी न्याय दिला.

नुसताच परिवहन विभाग नाही, तर मुख्यमंत्री जेव्हा एमएसआरडीसी विभागाचे मंत्री होते, त्यावेळेस एमएसआरडीसी विभाग ६ ते ७ हजार कोटी रुपयांच्या तोट्यात सुरु होता. याच एमएसआरडीसीला एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाने १० ते १२ हजार कोटी रुपयांनी नफ्यात आणले. नुसती टीकाटिप्पणी करण्यापेक्षा, जे वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जनतेला विकास करून दाखवू, हेच एसटी महामंडळाच्या आणि एमएसआरडीसी च्या प्रगतीने दिसून येत आहे. याला कार्यक्षमता म्हणतात.

जनतेमध्ये उतरून केलेले काम म्हणतात. कॉमन मॅनने कॉमन मॅनसाठी केलेले हे भरीव काम आहे. नुसती टीका टिप्पणी करून नाही तर जनतेमध्ये उतरून काम केल्यावर राज्याचा विकास होतो, हेच यातून स्पष्ट होते, असे उदय सामंत म्हणाले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

चंद्रपूर : आदिवासी उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित
कांद्याला अनुदान द्या अन्यथा राज्यभर आंदोलन – दिघोळे | BulletsIn
अमरावती मनपातील तोतया कर्मचाऱ्याला अटक, अडीच वर्षापासून होता कार्यरत | BulletsIn
कांद्यावरील निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त
भाजपने एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी – नाना पटोले

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापुरात अद्यापही चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा
Next Article वैभव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे चांगले काम केले – आ.संग्राम जगताप
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?