cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव कारची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू
Regional

वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव कारची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

CliQ INDIA
Last updated: November 10, 2023 9:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

* मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश, सहा-सात जण गंभीर जखमी

मुंबई, १० नोव्हेंबर (हिं.स.) : येथील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना मागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. चालक मोहम्मद सरफराज शेख विरोधात भादंवि 304 (2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सी लिंकवरील टोल प्लाझाच्या अवघ्या काही मीटर अंतरावर हा अपघात झाला. एका इनोव्हा गाडीने मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर पळून जात असताना टोल नाक्यावर थांबलेल्या वाहनांना इनोव्हा कारने उडवले. या अपघातात इनोव्हा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात चालक देखील जखमी झाला असून चालकासह अन्य चौघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातात हनिफ पिर, हमाबीबी पिर, खतीजा हटिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर असीम सदर, हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर चालकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाणार आहे. अपघातानंतर सी लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कारने सी लिंकवरून जात असलेल्या कारला धडक दिली. अपघातानंतर इनोव्हा कारच्या चालकाने कार दामटवली. वेग जास्त असल्याने इनोव्हा कारने टोलनाक्यावर उभ्या असलेल्या सुमारे सहा वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा ते सात जण जखमी झाले. तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचा देखील समावेश आहे.

गेल्या वर्षीही ऐन दिवाळीच्या तोंडावर वांद्रे-वरळी सी लिंकवर अपघाताची घटना घडली होती. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघतात ५ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १२ जण जखमी झाले होते.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

ग्राम विकासाची राष्ट्रीय चळवळ निर्माण व्हावी – पोपटराव पवार
शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अभिवादन | BulletsIn
पुणे-कात्रज चौक-नवले पूल डीपी रस्ता कागदावरच
अमरावती : चिखलदरा स्कायवॉकचे काम २ वर्षापासून बंदच
वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेसाठी शुभम बायस्कार यांची निवड

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे ओएनडीसी नेटवर्कवर सुविधा लाँच
Next Article भारत आणि बांगलादेश नौदलांचा समन्वित गस्त आणि बोंगोसागर सराव
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?