यवतमाळ, 16 डिसेंबर (हिं.स.) : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूल मध्ये प्रवेशाकरीता प्रवेश परीक्षा 25 फेब्रुवारी 2024 रोजी अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे अधिनस्त असलेल्या प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता आयाजित करण्यात येत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत सदर प्रवेश परीक्षा शासकीय आश्रमशाळा शिबला, ता. झरी जि. यवतमाळ व शासकीय आश्रमशाळा अंतरगांव ता.कळंब जि. यवतमाळ या परीक्षा केंद्रावर 25 फेब्रुवारी 2024 रोजी 11 ते 1 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षेकरीता विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पांढरकवडा प्रकल्प कार्यालय व कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामुल्य उपलब्ध आहेत.
करीता या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हापरिषद, नगरपालिका तथा नगरपरिषदांच्या प्राथमिक तथा माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य प्राथमिक तथा अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक सत्र 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वी, 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी 17 फेब्रुवारीपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे सादर करावे.
हिंदुस्थान समाचार
