सोलापूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास वर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी,मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेकरीता शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये बी. ए. / बी. कॉम/बी. एस्सी अशा12वी नंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमात (बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.orgया संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया खालील वेळापत्रकाप्रमाणे दि.19सप्टेंबर2025ते29नोव्हेंबर2025या कालावधीत सुरु राहणार आहे.
योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींकरीता १ व मुलांकरीता १ असे २ वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करावयाच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची विदयार्थ्यांची मागणी झाल्याने,वसतीगृह प्रवेशासाठी पुरेशे अर्ज प्राप्त न झालेने,प्रवेशासाठी मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांच्या प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार निवड यादी अंतिम करुन दि.17ऑक्टोबर2025रोजी वसतीगृहाची व दिनांक20नोव्हेंबर2025रोजी आधार व स्वपम योजनेची यादी शासन निर्देशानुसार प्रसिद्ध केली जाईल, तरी जिल्ह्यातील इतर मागासवर्ग,विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील वरील अभ्यासक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे गणेश सोनटक्के,सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,सोलापूर यांनी आवाहन केले आहे.
शासकीय वसतिगृह असलेल्या जिल्हयासाठी सन2025-26साठी शासकीय वसतीगृह पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार यासाठी (व्यवसायीक अभ्यासक्रम),अर्ज करण्याचे सुधारीत वेळापत्रक खालीलप्रमाणे -१२ वी नंतरच्या मायक अभ्यासक्रमामध्ये प्रवेग घेतलेल्या पदयो आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) – प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी – १९/०९/२०२५ २९/९/२०२५,अर्ज छाननी करावयाचा कालावधी –30.09.25ते5.10.25,पहिलो निवड गुणवत्तेनुसार अंतिम करणे य प्रसिद्ध करणे –06.10.2025,पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत -16.10.2025,रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे –17.10.2025,रिक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत –31.10.2025शासकीय वसतिगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार वसतिगृहाच्या क्षमते आभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विदयार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदमाज स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आचार योजनेसाठी विचारात घेतले जातील,असे पत्रकात नमूद आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
