मुंबई, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : मध्य रेल्वेचा एप्रिल – सप्टेंबर २०२३ मध्ये विक्रमी एकूण महसूल रु. ८,५६८.४१ कोटी जमा झाला आहे. जो एप्रिल ते सप्टेंबर- २०२२ मधील रु. ७,३९५.१८ कोटी च्या तुलनेत १५.८६% जास्त आहे. मध्य रेल्वेने वाणिज्यिक महसुलात सातत्यपूर्ण आपली सर्वोत्तम कामगिरी देण्याची गती कायम ठेवली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीत मध्य रेल्वेने रु. ८,५६८.४१ कोटीचा महसूल नोंदवला आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ७,३९५.१८ कोटीच्या तुलनेत १५.८६% अधिक आहे.
मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान मालवाहतुकीतून रु. ६०९.५० कोटीचा महसूल मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ५७१.०५ कोटीच्या तुलनेत ६.७३% अधिक आहे.
मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान प्रवासी वाहतुकीतून रु. ५७४.४३ कोटीचा महसूल मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ५२७.७८ कोटीच्या तुलनेत ८.८४% अधिक आहे.
मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान इतर कोचिंग महसूल रु. ६५.०६ कोटी मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ६३.७१ कोटीच्या तुलनेत २.१२% अधिक आहे (इतर कोचिंग महसूल म्हणजे पार्सल महसूल इ.)
मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ दरम्यान विविध महसूल रु. ३३.३१ कोटी मिळवला जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ३७.०८ कोटीच्या तुलनेत -१०.१७% कमी आहे. विविध महसूल म्हणजे नॉन-फेअर रेव्हेन्यू, (NFR), पार्किंग, केटरिंग, रिटायरिंग रूम इत्यादींमधून मिळणारा महसूल.
मध्य रेल्वेने उत्पन्नाला चालना देण्यासाठी विभागांवर बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) ची स्थापना आणि भाडे-व्यतिरिक्त महसूल उपक्रम आणि सघन विपणन आणि इतर तत्सम नाविन्यपूर्ण कल्पनांसह मुख्यालयातील विविध उपक्रमांमुळे महसुलात वाढ झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
