cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > मुंबईत १४,१९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण
Regional

मुंबईत १४,१९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण

CliQ INDIA
Last updated: October 17, 2023 5:50 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

मुंबई, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : मुंबईतील भटक्या प्राण्यांचे लसीकरण तसेच ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधत दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ प्रशासकीय विभागात रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या दाट लोकवस्तीच्या परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यात ९ हजार ४९३ भटके श्वान आणि ४ हजार ६९८ भटक्या मांजरांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत भटके प्राणी विशेषतः श्वानांपासून होणाऱ्या रेबिज रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.

भटक्या प्राण्यांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिजची लस देणे गरजेचे असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधत दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या वतीने ६ प्रशासकीय विभागात रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण, पी उत्तर, एस आणि टी या सहा विभागांचा समावेश आहे.

दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर आणि मुलुंड या परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ९ हजार ४९३ भटक्या श्वानांचे व ४ हजार ६९८ भटक्या मांजरांचे असे एकूण १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले.

दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत रेबिज लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी एकूण १५ पथके तैनात करण्यात आली होती. त्यात हाताने प्राणी पकडणाऱ्या १० पथकांचा तर जाळीने प्राणी पकडणाऱ्या ५ पथकांचा अंतर्भाव होता. या प्रत्येक पथकात एक लसटोचक, एक माहिती संकलक आणि पशू कल्याण संस्थेचा एक प्राणी हाताळणीस स्वयंसेवक यांचा समावेश होता.

देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत १४ हजार १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण आले आहे. या मोहिमेत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मिशन रेबिज, वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस, मुंबई ऍनिमल असोसिएशन, बाई साकरबाई दिनशॉ पेटिट पशुवैद्यकीय रुग्णालय, अहिंसा, जीव दया अभियान, इन डिफेन्स ऑफ ऍनिमल, युथ ऑर्गनायझेशन इन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, ऍनिमल मॅटर्स टू मी, जीव रक्षा ऍनिमल वेलफेअर ट्रस्ट, जेनीस स्मिथ ट्रस्ट आणि युनिव्हर्सल ऍनिमल वेलफेअर सोसायटी या संस्थादेखील सहभागी झाल्या होत्या.

पाळीव श्वानांचे लसीकरण करावे, नोंदणी करून परवाना प्राप्त करावा-

मुंबईतील नागरिकांनी त्यांचेकडे असलेल्या पाळीव श्वानाचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. तसेच पाळीव श्वानाची नोंदणी केली नसेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in यावर भेट देवून नोंदणी करून पाळीव श्वान परवाना प्राप्त करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

भंडारा : पेंढरी खुर्शीपार मार्गावर 3 वाघांचे एकाच वेळी दर्शन | BulletsIn
सोलापूर : वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात
वेरावली सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती अथक प्रयत्नानंतर पूर्ण
जनता ग्राहक सहकारी संस्था ची निवडणूक 23 मार्चला | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article साने गुरुजी, बहिणाबाईंच्या मातीतील साहित्य संमेलन दिशादर्शक ठरणार : डॉ. रविंद्र शोभणे
Next Article भिडे वाड्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?