छत्रपती संभाजीनगर, 2 सप्टेंबर (हिं.स.)। श्री संत भगवान बाबा गणेश मंडळ एन ४ सिडको यांच्या वतीने सर्व आजी माजी पोलीस पदाधिकारी यांच्या हस्ते आरती ठेवण्यात आली होती. या आरतीस छत्रपती संभाजीनगर सह पोलीस आयुक्त शिंदे व आमदार श्री विक्रम काळे प्रमुख उपस्थित होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कांचनकुमार चाटे,अध्यक्ष शुभम चाटे, कार्यध्यक्ष अशोकराव गिते, धनराज मुंडे , जय भगवान महासंघ प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब सानप व आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य चे प्रदेश सचिव (सा. न्या. विभाग) तथा मंडळाचे सल्लागार सुग्रीव मुंडे यांच्या सह मंडळ सर्व सदस्य आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
