भंडारा २८ नोव्हेंबर (हिं. स.) : भंडारावरून साकोलीकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाने साकोलीकडून भंडाराकडे जात असलेल्या दोन दुचाकीस्वारांना जोरधार धडक दिली. या घटनेत चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हि घटना भंडाऱ्यांच्या वैनगंगा नदीपुलावर घडली आहे. जखमींना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
