पुणे 17 ऑक्टोबर (हिं.स) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ सूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानांतर्गत आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी, ७३ विज्ञान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्याच्या उद्देशाने या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
आदिवासी विकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, नामांकित शाळा योजनेअंतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी २५० आश्रमशाळांची आदर्श आश्रमशाळा म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता आदर्श शाळांमध्ये आधुनिक सुविधांसह विज्ञान केंद्रांचीही उभारणी केली जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार
