भंडारा १७ ऑक्टोंबर (हिं. स ) : भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून माकडांच्या हैदोसामुळे छत तुटून एक वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. इंदिरा गभने (वय ६३) असे या महिलेचे नाव असून त्यांच्या पायाला गंभीर जखम झालीय.
यासंदर्भातील माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे माकडाने घरावर उडी घेतल्यामुळे पायऱ्यांचा भाग तुटून इंदिराबाई गभणे नामक महिलेच्या दोन्हीं पायांना मोठीं जखम झाली आहे. सुदैवाने पायऱ्यांचा भाग पायावर पडल्याने जीवित हानी टळली आहे. इंदिराबाई यांच्यावर लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर दिवसेनदिवस माकडांचा हैदोस वाढला असुन वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
