नाशिक, २३ डिसेंबर (हिं.स.) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जो व्हिडिओ आहे तो भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचला त्यामुळे उगाच कोणावरही आरोप करून काहीच उपयोग नाही वेळ आल्यानंतर ही सर्व माहिती सांगितली जाईल पण भाजप म्हणजे धुतल्या तांदुळासारखा नाही असा आरोप ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत हे आगामी २३ जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नाशिकला आले असून याबाबत रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नासिक मध्ये संजय राऊत यांचे आगमन झाल्यानंतर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते सुनील बागुल, ज्येष्ठ नेते आणि नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड माजी महापौर वसंत गीते, देवानंद बिरारी, राजू वाकसरे, सुनील गोडसे, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संजय राऊत यांनी सांगितले की, पक्षाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकार हा कदाचित अपघात असू शकतो पण ज्या पद्धतीप्रमाणे हे सगळं चालू आहे की पद्धत चुकीची आहे भाजपामध्ये देखील कोणीही धुतल्या तांदुळासारखा नाही वेळ पडल्यानंतर याबाबतचे सर्व माहिती ही पोलिसांना दिली जाईल असे स्पष्ट करून राऊत पुढे म्हणाले की ज्या पद्धतीप्रमाणे भाजप काम करत आहे ती पद्धत चुकीची आहे आता आम्ही नाशिक मध्ये कोणाच्या घरात ललित पाटील हा ड्रग माफिया हप्ते देत होता आणि छोटी भाभी मोठी भाभी कोणापर्यंत जात होती. कोणाला भेटत होती कोण काय करत होते हे सर्व आता आम्ही पुराव्याचे पोलिसांना देऊ आणि सर्व माहिती बाहेर येईल. बावनकुळे यांच्या मकाऊ येथील व्हिडिओ संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या एका गटाने हा व्हिडिओ आम्हाला पाठवला आहे आणि त्याची सत्यता पडताळूनच आम्ही हे बोललो आहोत त्यामुळे जर कोणी आम्हाला दगड मारत असेल तर त्या दगडाचा चिखल आता हा तुमच्या वरती होणारच आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार
