पुणे, 29 नोव्हेंबर (हिं.स.)। भाडे नाकारणे, नो पार्किंगमध्ये रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एक हजाराहून अधिक रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील रिक्षा वाहतुकीतील वाढता अनागोंदीपणा लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने १० नोव्हेंबरपासून विशेष मोहिम हाती घेतली आहे. विशेष पथकाकडून १७ दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये अवैधपणे धावणाऱ्या तसेच नियमभंग करणाऱ्या एक हजार ८७ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.शहरात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी रिक्षा चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
