पुणे 17 ऑक्टोबर (हिं.स) ”अंघोळीची गोळी” संस्थेच्या टीमने फर्गसन महाविद्यालय परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्याचा उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात. तेही सजीव आहेत, हे समजून घेत त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न या युवकांना केला.“खिळेमुक्त झाड’ आणि “आळेयुक्त झाड’ हा उपक्रम महाराष्ट्रभर विविध भागात राबवला जात आहे.हवामान बदलास वृक्ष संवर्धन हेच उत्तर आहे. त्यामुळे “खिळेमुक्त झाड’ हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा, असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील यांनी यावेळी केले.
माधव पाटील या तरुणाने सुरू केलेली “खिळेमुक्त झाडं’ मोहीम विस्तारण्यासाठी अनेक युवक प्रयत्न करत आहेत. त्यांना सामाजिक संस्थांची मदत त्यांना मिळत आहे.
हिंदुस्थान समाचार
