cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > मुख्यमंत्र्यांनी घेतला शिवडी – न्हावाशेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा
Regional

मुख्यमंत्र्यांनी घेतला शिवडी – न्हावाशेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

CliQ INDIA
Last updated: January 8, 2024 3:30 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

रायगड, 7 जानेवारी (हिं.स.) मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्य कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. कार्यक्रमाचे दिमाखदार आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आ.महेश बालदी,मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर,प्रधान सचिव तथा माहिती जनसंपर्क महासंचालनालायचे महासंचालक ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर,सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर,नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर असलेल्या या सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजन देखील दिमाखदार व्हावे. सिडको, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा व मनपा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग या सर्व यंत्रणानी आवश्यक त्या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करावी. तसेच सर्व यंत्रणानी कामामध्ये परस्पर समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच कार्यक्रम नियोजनामध्ये तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्था यांचे मार्गदर्शन घ्यावे असेही सांगितले.

अटल सेतूच्या शिवडी आणि चिरले या दोन्ही ठिकाणचा परिसर सुशोभित करण्यात यावा. तसेच या संपूर्ण मार्गाची नियमित स्वच्छता ठेवावी. चिरले ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गांवर रोड फर्निचरचा वापर करावा. या मार्गाचे सुशोभिकरण,सौंदर्यीकरण, आवश्यकता असेल तेथे दुरुस्ती तसेच परिसरातील भिंती रंगविणे आणि हरित पट्टे तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, मोठ्या प्रमाणावर वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास कोणतीही अडचण होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाची तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष (जादा) बसेस सोडणार
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गाव बंदचा ठराव
भाजपचे खासदार डॉक्टर कराड यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना
अभियंते आधुनिक जगाचे शिल्पकार – प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे
चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या 18 लक्ष 2 हजार 811 वर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापुरातून नववीत शिकणाऱ्या मुलाचं अपहरण
Next Article प. बंगाल : तृणमूल काँग्रेस नेत्याची हत्या
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?