नाशिक, १२ जानेवारी (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिक शहरात आगमन झाले. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरती कांदा फेकला आणि बॅनर फडकवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेटण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी परवानगी मागितली होती, परंतु त्यांची परवानगी रद्द करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी जिल्ह्यातील नाशिक, निफाड, येवला, दिंडोरी या तालुक्यांमध्ये बघावयास मिळाले. या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच रस्त्यावरती उतरत हातामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान करून स्मशान केलेल्या नाशिक जिल्ह्यात स्वागत आहे. अशा स्वरूपाचे बॅनर दाखवत आणि रस्त्यावरती कांदा उतरून नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार
