नाशिक, २१ डिसेंबर (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील लष्करी छावणी जवळ असलेल्या सैन्य दलाच्या पेट्रोल पंपा समोर सैन्य दलाच्या गाडीने धडक दिल्यामुळे एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या वेळेस घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरापासून जवळ असलेल्या आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या वडनेर गेट या लष्करी छावणी जवळ असलेल्या सैन्य दलाच्या पेट्रोल पंपा समोर सैन्य दलाच्या ट्रकने आपली ड्युटी संपवून घरी जात असलेल्या नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या गाडीला धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना सैन्य दलाच्या या ट्रक चालकाने तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच कुंदन सोनवणे यांचे निधन झाले होते त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
